तुपात भिजवलेल्या दोरखंडानं याकूबला होणार फाशी

1993 च्या मुंबई बॅाम्बस्फो़टातला गुन्हेगार याकुब मेमन सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला फाशी देण्यासाठी आवश्यक गोष्टींची जोरदार तयारी सुरु झाली आहे. 

Updated: Jul 25, 2015, 08:40 PM IST
तुपात भिजवलेल्या दोरखंडानं याकूबला होणार फाशी title=

नागपूर : 1993 च्या मुंबई बॅाम्बस्फो़टातला गुन्हेगार याकुब मेमन सध्या नागपूर मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत आहे. त्याला फाशी देण्यासाठी आवश्यक गोष्टींची जोरदार तयारी सुरु झाली आहे. 

याकुबला फाशी देण्यासाठी खास तयारी सुरु करण्यात आलीय. जेल मध्ये जिथे फाशी दिली जाते त्या परिसरात चारी बा़जूंना भिंतीं आहेत. मोकळ्या मैदानासारखा असलेल्या या परिसरात अचानक येणा-या पावमुळे अडथळा येऊ नये यासाठी इथे पत्र्याचं शेडही उभारण्यात येत आहे. याशिवाय...

याकूबची उंची आणि त्याच्या वजनाची नोंद करण्यात आलीय. कैद्याला किती खोल खाली सोडून लटकवायचं, यासाठी या नोंदी महत्त्वाच्या असतात. जेलच्या नियमावलीनुसार सांगायचं झालं तर...
- 45 किलोपर्यंत वजनाच्या कैद्याला 8 फूट खोलपर्यंत लटकवलं जातं.  
- 45 ते 60 किलोदरम्यान वजनाच्या कैद्यांना 7 फूट 6 इंच तर 
- 60 ते 75 किलो वजनाच्या कैद्यांना 7 फूट आणि 
- 75 ते 90 किलो वजनाच्या कैद्यांना 6 फूट खोल लटकवण्याची तरतूद आहे.             

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार याकूबचं वजन जवळपास 60 किलो आहे. याकूबला फाशी देण्यासाठीचा दोरखंडही तयार आहे. तुरुंग प्रशासनाने एकूण तीन दोरखंड तयार ठेवले असून, त्यापैंकी एकाचा वापर प्रत्यक्ष फाशीसाठी केला जाणार आहे. फाशी दरम्यान कैद्याला जास्त त्रास होऊ नये तसंच दोरखंडही मजबूत रहावा यासाठी दोरखंड तुपात भिजवून ठेवला जातो. शिवाय दोरखंडाला साबण आणि केळ्याचा लेपही लावला जातो. 

सूत्रांच्या माहितीनुसार याकूबला फाशी देण्यासाठी तीन जणांना प्रशिक्षण दिलं जात आहे. हे तिघे रोज सकाळ आणि संध्याकाळी दोरीला गाठ मारुन फाशी देण्याचा सराव करत आहेत 
  
फाशीसाठी निवडलेल्या दोरखंडांचीही चाचणी घेतली जाते. यासाठी कैद्याच्या वजनाच्या दिडपट वजनाचा पुतळा बनवून, निवडलेल्या दोरखंडांद्वारे त्या पुतळ्याला फाशी देण्याचा सराव केला जातो. ही चाचणी यशस्वीपणे पूर्ण करणारा दोरखंडच प्रत्यक्ष फाशीच्या दिवशी वापरला जातो. विशेष म्हणजे, या दोरखंडांनिशी सराव करणाऱ्यांना फाशीच्या दिवसापर्यंत, त्यांच्यापैकी कोण प्रत्यक्ष फाशी देणार याची माहिती दिली जात नाही. तर फाशीच्याच दिवशी सकाळी तुरुंग प्रशासन प्रत्यक्ष फाशी कोणाद्वारे द्यायची ते निश्चित करतं...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.