दुर्दैवी घटना: यवतमाळचे एकाच कुटुंबातील चौघं जण अमरावतीत वाहून गेले

गेल्या दोन दिवसांपासून विदर्भाला पावसानं अक्षरशः झोडपलं आहे. यवतमाळमधील बिल्दोरी पुलावर ऑल्टो कारमधून प्रवास करणारे एकाच कुटुंबातील चौघं जण कारसह वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडलीय. बुधवारी रात्री ही कार वाहून गेली.

Updated: Aug 6, 2015, 12:48 PM IST
दुर्दैवी घटना: यवतमाळचे एकाच कुटुंबातील चौघं जण अमरावतीत वाहून गेले title=

यवतमाळ: गेल्या दोन दिवसांपासून विदर्भाला पावसानं अक्षरशः झोडपलं आहे. अमरावतीच्या अंजनवती ते आर्वी दरम्यान लोअर वर्धा धरणाच्या बॅक वाटरमध्ये असलेल्या पुलावरुन अल्टो कार पाण्यात बुडाली. त्यामुळं कारमधून प्रवास करणारे एकाच कुटुंबातील चौघं जण कारसह वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडलीय. बुधवारी रात्री ही कार वाहून गेली.

मुसळधार पावसामुळं विदर्भातील नद्या दुथड्या भरुन वाहत आहेत. बुधवारी रात्री उशीरा मूळचे यवतमाळच्या प्रगतीनगर इथं राहणारे आजनकर कुटुंबीय त्यांच्या ऑल्टो कारमधून वर्ध्यातील आरळीला लग्नासाठी जात होतं. कोंडण्यपूर ते अंजन चिंगी मार्गावर असलेल्या पूलावरुन जात असताना पाणी गाडीत शिरलं आणि दबावामुळं गाडी पाण्यात वाहून गेली.

या सर्व गोंधळात आजनकर कुटुंब गाडीतून बाहेर पडू शकले नाहीत आणि संपूर्ण कुटुंबच पाण्यात वाहून गेलं. रात्रभर त्यांचा शोध सुरु होता. अखेर आज सकाळी चारही जणांचे मृतदेह सापडले.

वाहून गेलेल्या कुटुंबियांची नावं- 

1. संजय गोविंद आजनकर
2. गजानन गोविंद आजनकर
3. सौ. गायत्री गोविंद आजनकर
4. श्रावमी गजानन आजनकर (मुलगी)

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.