आजीबरोबर खेळताना चिमुरडा बोअरवेलमध्ये पडला आणि...

पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात बोअरवेलमध्ये पडलेल्या अडीच वर्षांच्या मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं. दोनशे फूट खोल बोअरवेलमध्ये हा लहानगा अंदाजे अठरा ते वीस फूटांवर अडकला होता. पुणे आग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून या मुलाला, सुखरूप बाहेर काढलं. त्याला उपचारांसाठी पूण्यातल्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 

Updated: Aug 6, 2015, 11:09 AM IST
आजीबरोबर खेळताना चिमुरडा बोअरवेलमध्ये पडला आणि...  title=
फाईल फोटो

पुणे : पुणे जिल्ह्यातल्या पुरंदर तालुक्यात बोअरवेलमध्ये पडलेल्या अडीच वर्षांच्या मुलाला सुखरुप बाहेर काढण्यात आलं. दोनशे फूट खोल बोअरवेलमध्ये हा लहानगा अंदाजे अठरा ते वीस फूटांवर अडकला होता. पुणे आग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून या मुलाला, सुखरूप बाहेर काढलं. त्याला उपचारांसाठी पूण्यातल्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. 
 
साडे सहा तासाच्या अथक परिश्रमानंतर अडीच वर्षांच्या सोहमला बोअरवेलमधून सुखरुप बाहेर काढण्यात यश आलं. पुणे अग्निशमन दलानं सोहमला बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. बुधवारी साधरणत: पाच वाजण्याच्या सुमारास सोहम आपल्या आजीबरोबर खेळत होता. मात्र, अचानकपणे सोहम गायब झाला. त्याच्या रडण्याचा आवाज येत असल्यानं त्याचा शोधायला सुरुवात केली. त्यावेळी तो बोअरमध्ये पडल्याचं आढळलं.  रात्री ११ वाजण्याच्या सुमारास एनडीआरएफचं पथक घटनास्थळी दाखल झालं. रात्री १२ वाजून ५ मिनिटांनी सोहमला एनडीआएफ आणि पुणे अग्निशमन दलानं सुखरूप बाहेर काढलं. 

साडे सहा तास बोअरमध्ये अडकल्यानं आणि काही ठिकाणी जखमा झाल्यानं सोहमाला पुढील उपचारांसाठी पुण्यातल्या केईएम रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. सोहमची प्रकृती स्थिर असल्याचं बालरोगतज्ज्ञ डॉ. विनायक बांदेकर यांनी म्हटलंय. 

पुरंदर तालुक्यातल्या माळशिरसमधील लोळेवस्तीत वास्तव्यास असलेल्या यादव कुटुंबानं एक-दोन दिवसांपूर्वीच पाण्यासाठी बोअर घेतलं. मात्र, पाणी लागलंच नाही. त्यामुळं हे बोअर एका पोत्यानं झाकून ठेवलं होतं. आता असा प्रकार पुन्हा घडू नये यासाठी ठोस पावलं उचलण्याची गरज निर्माण झाली आहे. 
 

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.