दिग्गज नेत्यांची मुलं झेडपीच्या शाळेत...

यंदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राज्यातल्या अनेक दिग्गज नेत्यांची मुलं राजकारणाचा पहिला धडा गिरवण्याची शक्यता आहे. 

Prashant Jadhav प्रशांत जाधव | Updated: Jan 24, 2017, 07:06 PM IST
 दिग्गज नेत्यांची मुलं झेडपीच्या शाळेत... title=

मुंबई : यंदा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राज्यातल्या अनेक दिग्गज नेत्यांची मुलं राजकारणाचा पहिला धडा गिरवण्याची शक्यता आहे. 

अनेक नेत्यांच्या मुलांनी जिल्हा परिषदेच्या निवडणूकीत आपलं नशिब आजमावण्याची तयारी केलीय. त्यात सर्वात पहिला नंबर लागतोय तो माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुखांचे चिरंजीव धीरज देशमुखांचा. धीरज देशमुख जिल्हा परिषद निवडणुकीत उभे राहणार आहेत. 

लातूर तालुक्यातील एकूर्का गटातून ते निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक आहेत. लातूर जिल्हा परिषद अध्यक्षपद हे सर्वसाधारण जागेसाठी रिक्त झाल्यामुळं धीरज देशमुख यांनी तयारी सुरु केल्याचं बोललं जातंय. विलासरावांचे ज्येष्ठ चिरंजीव अमित देशमुख हे लातूर शहरचे आमदार आहेत. तर दुसरीकडे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानेवेंच्या कन्या आशा दानवे-पांडे याही जिल्हापरिषदेच्या मैदानात उतरणार असल्याची चर्चा आहे. 

पाणी पुरवठा मंत्री बबनराव लोणीकरांच्या चिरंजीवांनी पुन्हा एकदा जिल्हापरिषदेवर जाण्याचा निर्णय घेतलाय. इकडे कोकणात राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंच्या कन्या आदिती तटकरे, भास्कर जाधवांचे पुत्र विक्रांत जाधव आणि दिवंगत आर आर पाटील यांची कन्या स्मिता पाटीलही निवडणूकीच्या रिंगणात उतरणार आहेत.