आदर्श घोटाळ्याप्रकरणी आज आरोपपत्र?

Last Updated: Tuesday, July 3, 2012 - 12:17

www.24taas.com, मुंबई

 

आदर्श सोसायटी घोटाळ्याप्रकरणी सीबीआय आज आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता आहे. सीबीआयने दोन आठवड्यापूर्वी न्यायालयाला दहा दिवसांत आरोप पत्र दाखल करु अशी हमी दिली होती.

 

मुंबई हायकोर्टात ४ तारखेला आदर्श घोटाळा प्रकरणावर सुनावणी आहे. त्यामुळं या सुनावणीपूर्वीच सीबीआय आरोपपत्र दाखल होणार असल्याचं समजतंय. काही अधिका-यांविरोधात हे आरोपपत्र दाखल करण्य़ात येण्याची शक्यता आहे. त्यामुळं पहिल्या फेरीत तरी निवृत्त अधिका-यांचाच नंबर लागण्याची चिन्ह आहेत.

 

सध्या सेवेत असलेल्या अधिका-यांविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी सरकारच्या परवानगीची आवश्यकता आहे. त्यामुळं त्यांच्याविरोधात सध्यातरी आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता नाही,

First Published: Tuesday, July 3, 2012 - 12:17
comments powered by Disqus