दुष्काळासाठी राज्याची मलमपट्टी!

दुष्काळाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यात सध्या 1500 टँकरद्वारे 509 गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

Updated: May 16, 2012, 08:47 PM IST

www.24taas.com, मुंबई

दुष्काळाच्या मुद्द्यावर मंत्रिमंडळाच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. राज्यात सध्या 1500 टँकरद्वारे 509 गावांना पाणीपुरवठा करण्यात येत असल्याची माहिती राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी पत्रकार परिषदेत दिली.

तसचं राज्यात 157 चारा डेपो सुरुन, 14 चारा छावण्या उघडल्याची माहितीही मुख्यमंत्र्यांनी दिलीय. तसचं राज्यात 15 तालुक्यांत सिंमटचे बंधारे बांधण्यात येणार असून, त्यासाठी 10 कोटींपर्यंत खर्च करण्यात येणार आहे.

दुष्काळावरून  राष्ट्रवादीच वाद

तर दुष्काळाच्या मुद्द्यावरुन राष्ट्रवादीच्या नेत्यांमध्येही वाद झाला. चारा डेपोवरुन उपमुख्यमंत्री अजित पवार आणि गृहमंत्री आर. आर. पाटील यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. हिरवा चारा जास्त प्रमाणात द्या, अशी मागणी आर. आर पाटील यांनी केली.

तर हिरवा चारा दिला तर डेअरीवाले पळवतील, अशी भूमिका अजितदादांनी घेतली. चा-याचे योग्य वाटप सुरु असल्याचंही अजितदादांनी म्हटलय.