मध्य रेल्वे बारा डब्यांची

आजपासून मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सर्व गाड्या बारा डब्यांच्या चालविल्या जाणार आहेत.

Updated: Nov 23, 2011, 05:14 AM IST

झी २४ तास वेब टीम, मुंबई

 

आजपासून मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावरील सर्व गाड्या बारा डब्यांच्या चालविल्या जाणार आहेत.

 

मध्य रेल्वेच्या मुख्य, ट्रान्स हार्बर आणि हार्बर मार्गावर एकूण १५७३ सेवा चालविल्या जातात. यापैकी मुख्य मार्गावर ७८५ सेवा चालविल्या जात आहेत. गेल्या महिन्यातच ७२५ नऊ डब्यांच्या सेवा बारा डब्यांच्या करण्यात आल्या. त्यामुळे मध्य रेल्वेमार्गावरील रेल्वे प्रवास काहीसा सुकर होण्याची चिन्हे आहेत.

 

उर्वरीत पाच नऊ डब्यांच्या गाड्या उद्या सकाळपर्यंत बारा डब्यांच्या करण्यात येतील. त्यामुळे सायंकाळपासूनच मुख्य मार्गावरील सर्व सेवा बारा डब्यांच्या चालविण्यात येतील, असे मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी विद्याधर मालेगावकर यांनी सांगितले.