मैदानासाठी राज ठाकरे सर्वोच्च न्यायालयात

दादरमधील शिवाजी पार्क मैदान निवडणूक प्रचारासाठी मिळावे यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यासाठी मनसेचे आमदार नितिन देसाई हे आज दिल्लीला रवाना झाले आहेत.

Updated: Feb 9, 2012, 03:49 PM IST

www.24taas.com, मुंबई 

 

 

दादरमधील शिवाजी पार्क मैदान निवडणूक प्रचारासाठी मिळावे यासाठी मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यासाठी मनसेचे आमदार नितिन देसाई हे आज दिल्लीला रवाना झाले आहेत.

 

 

 

प्रचार सभेसाठी शिवाजी पार्कचं मैदान मिळण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयात याचिका मनसेने दाखल केली होती. मात्र, ही याचिका फेटाळताना मैदानाचा वापर प्रचारासाठी करता येणार नाही, असं न्यायालयाने म्हटलं होतं. न्यायालयाच्या निर्णयावर राज ठाकरे यांनी नाराजी व्यक्त केली होती. जर लोकशाहीत प्रचारासाठी मैदाने मिळाली नाहीत तर लोकांपर्यंत पोहचणार कसे, असा सवालही ठाकरे यांनी उपस्थित केला होता. मैदान मिळाले नाही तर रस्त्यावर सभा घेऊ, असे मत व्यक्त केलं होतं

 

 

तसंच कोर्ट पक्षपाती असल्याची शंकाही राज यांनी घेतली आहे. कोर्टावं कायद्याच्या चौकटीतच राहून निर्णय द्यावेत असं मतही राज ठाकरेंनी व्यक्त केलंय. कोर्टाच्या निकालाचा कायद्याशी संबंध नाही. हायकोर्टानं निर्णय देवून पाच दिवस झालेत. सुप्रीम कोर्टात जाण्यासाठी कोर्टाची सही आवश्यक आहे मात्र, हायकोर्टाकडून सहीच करण्यात आलेली नाही. यामागे कोर्टाचा काही वेगळी उद्देश आहे का, असा सवालही उपस्थित केला आहे.

 

 

शिवाजी पार्क मैदानावर 13 फेब्रुवारीला प्रचार सभा घेण्यास हायकोर्टानं मनाई केल्यानंतर मनसेतर्फे शिवसेना भवनासमोरील गडकरी चौकात सभा घेण्यासाठी परवानगी मागण्यात आली. मात्र, वाहतुकीची कोंडीचं कारण देत पोलिसांनी सभेची परवानगी देता येणार नसल्याचं सांगितलं. मात्र, पोर्तुगीज चौकात सभा घेण्यास परवानगी देण्याची पोलिसांनी तयारी दाखविली. मात्र, गडकरी चौकात वाहतुकीचं कारण दाखवून सभेला परवानगी नाकारत असलेले पोलीस पोर्तुगीज चर्च चौकात परवानगीची तयारी कसे दाखवतात, असा सवाल मनसेकडून विचारला जातोय.

 

 

आज मनसेने वेगळी भूमिका घेत सर्वोच्च न्यायालयात  जाण्याता निर्णय घेतला. मनसेचे आमदार नितीन सरदेसाई दिल्लीला रवाना झाले आहेत. ते मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात याचिका दाखर करणार आहे, अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली.  निवडणुकीच्या जाहीर सभेसाठी मैदान मिळण्यासाठी शेवटी मनसेने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. त्यामुळे शिवाजी पार्क मैदान मिळेल की नाही, याकडे लक्ष लागले आहे.

 

[jwplayer mediaid="44552"]