राज ठाकरे घेणार उद्धव यांची भेट

Last Updated: Monday, July 16, 2012 - 14:25

www.24taas.com, मुंबई

 

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आपला दौरा अर्धवट टाकून शिवसेनेचे कार्याध्‍यक्ष उद्धव ठाकरे यांची भेट घेणार आहेत. उद्धव ठाकरे यांना आज सकाळी  छातीत दुखू लागल्याने लिलावती रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आले आहे.  त्यामुळे राज ठाकरे यांनी हा निर्णय घेतला आहे.

 

राज आजपासून तीन दिवसांच्‍या अलिबाग दौ-यावर जाणार होते. पक्षाच्‍या बैठकीसाठी हा दौरा होता. परंतु, उद्धव ठाकरे यांना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आल्‍यानंतर त्‍यांनी दौरा रद्द केला. ते वडखळ येथून माघारी फिरले. राज तात्काळ उद्धव यांच्‍या भेटीसाठी मुंबईला रवाना झाले आहेत.

 

उद्धव ठाकरे यांच्या छातीत दुखू लागल्‍यामुळे त्‍यांना दाखल करण्‍यात आले आहे, असे शिवसेनेने सांगितले. प्राथमिक तपासणी करण्‍यात आली. उद्धव ठाकरेंना रुग्‍णालयात दाखल करण्‍यात आल्‍याची माहिती मिळाल्‍यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते रुग्‍णालयाबाहेर गोळा झाले आहेत. उद्धव यांच्यासोबत त्यांचे चिरंचिव आदित्य ठाकरे आहेत.



First Published: Monday, July 16, 2012 - 14:25


comments powered by Disqus