‘सीएसटी’तून छत्रपती गायब!

By Shubhangi Palve | Last Updated: Saturday, March 30, 2013 - 10:39

www.24taas.com, मुंबई
‘व्हिक्टोरिया टर्मिनस’ अर्थात ‘व्हीटी’ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या रेल्वे स्टेशनचं नाव बदलून ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ अर्थात ‘सीएसटी’ असं करण्यात आलं... पण, आता मात्र काळाच्या ओघात आणि रेल्वेच्या ढिसाळ कारभारामुळं ‘सीएसटी’तून छत्रपती हे शब्द गायब झाले आहेत.
आज छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार ३८३ वी जयंती साजरी होतेय. पण, मुंबईत मात्र छत्रपतींचा एकेरी नावानं सर्रास उल्लेख झालेला पाहायला मिळतोय. रेल्वे स्थानकावर असलेल्या इंडिकेटरवरील शिवाजी टर्मिनसमधून ’छत्रपती’ गायब करण्याचा अजब प्रताप रेल्वे व्यवस्थापनानं केलाय.

छत्रपती शिवाजी टर्मिनस हे मुंबईतील एक ऐतिहासिक स्थानक आहे. मुंबईच्या बोरीबंदर भागात असलेले हे स्थानक इ.स. १८८७ मध्ये व्हिक्टोरिया राणीच्या राज्यभिषेकाच्या सुवर्णजयंतीनिमित्त बांधण्यात आले होते. ब्रिटिशांची ओळख असलेल्या या स्थानकाचे मार्च १९९६ साली केंद्रातील यूपीए सरकारने त्याचे ‘छत्रपती शिवाजी टर्मिनस’ असं नामकरण केलं. परंतू, रेल्वे प्रशासनातील अमराठी अधिकार्यां च्या हलगर्जीपणामुळे मध्य रेल्वेच्या कर्जत, कसारापर्यंत तसेच हार्बर, ट्रान्स हार्बरसह अनेक स्थानकांवरील इंडिकेटरवर ‘छत्रपती शिवाजी स्थानका’कडे जाणार्यार लोकलचा ‘एसटी’ (शिवाजी स्थानक) असा एकेरी उल्लेख केला जातोय.

First Published: Saturday, March 30, 2013 - 10:36
comments powered by Disqus