मुंबईत उद्या ५० टक्के पाणी कपात

By Prashant Jadhav | Last Updated: Wednesday, June 26, 2013 - 18:50

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईला पाणीपुरवठा करणा-या तानसाची जलवाहिनी आणखी दोन ठिकाणी फुटलीय. त्यामुळं मुंबईत आज 15 टक्के तर उद्या 50 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे.
शहराच्या पूर्व आणि पश्चिम भागात ही पाईपलाईन फुटलीये. या घटनेमुळे दादर, माटुंगा, परळ, एलफिस्टन, नायगाव, वरळी, माहिम या भागातल्या पाणीपुरवठ्यावर परीणाम झाला.
तानसा धरणाची पाईपलाईन एकूण तीन ठिकाणी फुटलीये. त्यामुळं पाणीकपातीचा निर्णय घेण्यात आलाय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, June 26, 2013 - 18:50
comments powered by Disqus