महायुतीत चौथा भिडू नकोच- आठवले

By Jaywant Patil | Last Updated: Wednesday, June 26, 2013 - 17:55

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
महायुतीत चौथा भिडू नको यावर महायुतीतल्या जवळपास सर्वच पक्षांचं एकमत झाल्याचं दिसतंय. रामदास आठवलेंनीही मनसेला दूर ठेवण्याचा पुनरूच्चार केला आहे.
भाजपनं काल महायुतीचा विस्तार करण्यासाठी कुणाची वाट पाहणार नसल्याचं भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फ़डणविस यांनी सांगत राज ठाकरेंच्या मनसेला टोला हाणला होता. हीच भूमिका घेत आरपीआय नेते रामदास आठवलेंनीही आता महायुतीत मनसेचा समावेश करू नये असं सांगितलंय. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मनसेला महायुतीत घेण्यासाठी हात पुढे केला होता. मात्र राज ठाकरेंनी त्यांना टाळी देणार नसल्याचं स्पष्ट केल्यानंतर उद्धव ठाकरेंनी आक्रमकपणे मनसेला विरोध केला होता.
मात्र आता भाजप आणि आरपीआयनंही त्यांच्या सुरात सूर मिसळल्यामुळं तिघांमध्ये एकमत झाल्याचं दिसतंय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फॉलो करा.

First Published: Wednesday, June 26, 2013 - 17:55
comments powered by Disqus