आयआयटी मुंबईतील 70% विद्यार्थी रोज अंघोऴ करत नाहीत

आयआयटी मुंबई या संस्थेतील 10% विद्यार्थी आठवड्यातून फक्त एकदाच अंघोळ करतात. एका सर्वेक्षणानुसार हा आकडा समोर आला आहे.

Updated: Sep 1, 2016, 04:18 PM IST
आयआयटी मुंबईतील 70% विद्यार्थी रोज अंघोऴ करत नाहीत title=

मुंबई : आयआयटी मुंबई या संस्थेतील 10% विद्यार्थी आठवड्यातून फक्त एकदाच अंघोळ करतात. एका सर्वेक्षणानुसार हा आकडा समोर आला आहे.

या संस्थेने विद्यार्थ्यासाठी आयोजित केलेल्या सर्वेक्षणातून हा अभ्यास केला आहे. आयआयटी मुंबई या संस्थेतील फक्त 30% लोक रोज अंघोळ करतात.

संस्थेने केलेल्या या सर्वेक्षणात 40% विद्यार्थी आपल्या मित्रांबरोबर राहणं पसंत करतात. तर 66% विद्यार्थ्यांना घरच्यांबरोबर जवळीक ठेवणे जास्त महत्त्वाचं वाटतं.