ई- प्रबोधनानंतर शिवसेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये ‘शिव आरोग्य सेवा’!

मुंबईत नुकतीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी, त्यांनी सेनेच्या 'व्हिजन डॉक्युमेंट'चा पुढचा टप्पा जाहीर केला. यामध्ये, सत्तेत आल्यानंतर ‘शिव आरोग्य सेवा’ राज्यात लागू करण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलंय. 

Updated: Sep 7, 2014, 02:47 PM IST
ई- प्रबोधनानंतर शिवसेनेच्या व्हिजन डॉक्युमेंटमध्ये ‘शिव आरोग्य सेवा’! title=

मुंबई: मुंबईत नुकतीच शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद पार पडली. यावेळी, त्यांनी सेनेच्या 'व्हिजन डॉक्युमेंट'चा पुढचा टप्पा जाहीर केला. यामध्ये, सत्तेत आल्यानंतर ‘शिव आरोग्य सेवा’ राज्यात लागू करण्याचं आश्वासन उद्धव ठाकरे यांनी दिलंय. 

सत्तेत आल्यावर टेलि मेडिसीनच्या माध्यमातून आरोग्यसेवा देणार असल्याचं उद्धव ठाकरे म्हणाले. ‘शिव आरोग्य’च्या माध्यमातून खेडोपाड्यांमधील आरोग्यकेंद्रांमध्ये शहरी भागातील तज्ज्ञ डॉक्टरांचं मार्गदर्शन उपलब्ध करुन दिलं जाईल.

सुरुवातील सात जिल्ह्यांमध्ये शिव आरोग्य योजना राबवण्यात येणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी स्पष्ट केलं.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.