राज ठाकरे- बच्चन कुटुंबियांमधली जवळीक वाढली

अमिताभ बच्चन आणि राज ठाकरे यांच्या कुटुंबामधील स्नेह अधिक दृढ़ झालंय.

Updated: Oct 16, 2016, 10:21 PM IST
राज ठाकरे- बच्चन कुटुंबियांमधली जवळीक वाढली title=

मुंबई : अमिताभ बच्चन आणि राज ठाकरे यांच्या कुटुंबामधील स्नेह अधिक दृढ़ झालंय. निमित्त ठरलंय एक मनगटी ब्रँडेड परदेशी घड्याळ तेही अमिताभ बच्चन यांचे स्वतःचे. नुकताच अमिताभ बच्चन यांचा वाढदिवस साजरा झाला. यंदा त्यांच्या वाढदिवसानिमित्त व्यंग्यचित्रकार राज ठाकरे यांनी आपल्या शैलीत त्यांना शुभेच्छा दिल्या.

खास अमिताभ बच्चन यांच्यासाठी राज ठाकरेंनी व्यंगचित्र रेखाटले. ते चित्र घेऊन राज ठाकरे यांचे चिरंजीव अमित आणि कन्या उर्वशी मनसेचे चित्रपट कर्मचारी सेनेचे अध्यक्ष अमेय खोपकर यांच्यासमवेत 'जलसा' वर गेले. या भेटीत अमिताभ बच्चन यांचे राज ठाकरे यांच्या कुटुंबियांकडून वाढदिवसानिमित्त अभिष्टचिंतन करण्यात आलं.

या भेटीवेळी बच्चन साहेबांच्या मनगटावरील घड्याळाबाबत अमित ठाकरे यांना कुतूहल वाटलं. गप्पा मारताना त्यांनी जिज्ञासेपोटी त्या घड्याळा बाबत बच्चन साहेबांकडे माहिती विचारली.

दोन दिवसांनी म्हणजे शनिवारी संध्याकाळी बच्चन यांनी आपले ते ब्रँडेड मनगटी घड्याळ अमितला सप्रेम भेट म्हणून कृष्णकुंज वर पाठवले. अमिताभ बच्चन यांची कृष्णकुंजवर दाखल झालेली ही भेट राज ठाकरे त्यांचे कुटुंबिय विशेषतः अमितसाठी आश्चर्याचा सुखद धक्का देणारी ठरली.

राज ठाकरेंनी काढलेलं अमिताभ बच्चन यांचं व्यंगचित्र