`आप` कार्यालय हल्ला भोवणार, नेत्याची राष्ट्रवादीतून हकापट्टी

मुंबईत आपच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमोल मातेले यांची पदावरुन हकालपट्टी करण्याचे संकेत पक्षानं दिलेत. राष्ट्रवादी काँग्रेस हिंसाचाराचं समर्थन करणार नाही, असं सांगत जितेंद्र आव्हाड यांनी कारवाई करण्याचे संकेत दिलेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 22, 2014, 08:48 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मुंबईत आपच्या कार्यालयाची तोडफोड केल्याप्रकरणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे अमोल मातेले यांची पदावरुन हकालपट्टी करण्याचे संकेत पक्षानं दिलेत. राष्ट्रवादी काँग्रेस हिंसाचाराचं समर्थन करणार नाही, असं सांगत जितेंद्र आव्हाड यांनी कारवाई करण्याचे संकेत दिलेत.
आपनं राष्ट्रवादीवर केलेल्या आरोपांच्या निषेधार्थ ही तोडफो़ड करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसनं केजरीवाल आणि दमानियांचा पुतळा जाळला. याप्रकरणी शंभरपेक्षा जास्त कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलंय.
दरम्यान राष्ट्रवादीच्या हल्ल्यानंतर राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर आंदोलन करण्यासाठी तयारीत असलेल्या आपचे नेते मयांक गांधी आणि त्यांच्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी अटक केलीय.
अंधेरीतील चकाला येथे `आम आदमी पक्षा`चे कार्यालय असून शनिवारी दुपारी राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते `आप`च्या कार्यालयात शिरले. संतप्त कार्यकर्त्यांनी कार्यालयातील सामानाची तोडफोड केली. तसेच यावेळी राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केजरीवाल यांची पोस्टर्सही फाडली.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.