राज ठाकरेंनी काढले अटलजींचे व्यंगचित्र

मुलाखती दरम्यान बुलटे ट्रेन ते शैक्षणिक धोरण सर्वच विषयांवर राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केली. 

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Jan 8, 2017, 08:34 PM IST
राज ठाकरेंनी काढले अटलजींचे व्यंगचित्र title=

मुंबई : मुंबईत झालेल्या शोध मराठी मनाचा या सारस्वतांच्या मेळाव्यात आज मनसेचे अध्यक्ष राज ठाकरेंची प्रकट मुलाखत घेण्यात आली. मुलाखतीच्या शेवटी यावेळी राज ठाकरेंमधला व्यंगचित्रकारही जागा झाला.  

यावेळी मुबई अहमदाबादला बुलेट ट्रेनची गरज काय आहे, काय ढोकळा खायला जायचंय का, हे कशासाठी केलं जातंय. मुंबई यांना मिळाली नाही, हे अजूनही यांच्या डोक्यातून जात नाहीय का? असा सवाल यावेळी राज ठाकरेंनी केला.

राज ठाकरेंनी यावेळी अटलबिहारी वाजपेयींचं व्यंगचित्र काढलं.  मुलाखती दरम्यान बुलटे ट्रेन ते शैक्षणिक धोरण सर्वच विषयांवर राज ठाकरेंनी चौफेर फटकेबाजी केली.