बॅंक कर्मचाऱ्यांचा संप मागे, पगार वाढीवर ठाम

बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला देशव्यापी संप पुढे मागे घेतला आहे. त्यामुळे २१ ते २४ जानेवारी दरम्यान या कालावधीदरम्यान बँका सुरू राहणार आहेत.

Updated: Jan 20, 2015, 10:47 AM IST
बॅंक कर्मचाऱ्यांचा संप मागे, पगार वाढीवर ठाम title=

मुंबई : बँक कर्मचाऱ्यांनी पुकारलेला देशव्यापी संप पुढे मागे घेतला आहे. त्यामुळे २१ ते २४ जानेवारी दरम्यान या कालावधीदरम्यान बँका सुरू राहणार आहेत.

बँक कर्मचारी संघटना आणि इंडियन बँक्स असोसिएशनदरम्यान सोमवारी उशिरापर्यंत झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. दरम्यान, गेल्या दोन वर्षांपासून वेतनवाढीसह अन्य मागण्यांसाठी आमचा संघर्ष सुरू आहे. वेळोवेळी आश्वासनं देऊनही त्या आश्वासनांची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे हा संप पुकारला होता. आता आश्वासनानंतर हा संप पुढे ढकलीत आहोत. मागण्या मान्य न झाल्यास संपाचे हत्यार पुन्हा उपसावे लागेल, असे संघटनेने म्हटले आहे.

दोन्ही संघटनांदरम्यान तीन आणि चार फेब्रुवारी रोजी पुन्हा बैठक होणार आहे. त्यात आमच्या मागण्या मान्य न झाल्यास फेब्रुवारी अखेरीस चार दिवसांचा देशव्यापी संप पुकारण्यात येईल, अशी माहिती युनायटेड फोरम ऑफ बँक एम्प्लॉइजचे राज्य निमंत्रक विश्वास उटगी यांनी दिली.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.