भुजबळांच्या ट्रस्टची चौकशी करून कारवाई करा - हायकोर्ट

बांधकाममंत्री छगन भुजबळ संचालक असलेल्या, नाशिक येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या व्यवहाराची मुंबई उच्च न्या़यालयानं दखल घेतलीये. याचिकाकर्त्यांनी केलेल्या आरोपांची शिक्षण शुल्क कमिटीने चौकशी करुन नियमानुसार कारवाई करावी, असे आदेश मंबई उच्च न्यायालयानं दिलेत.

सुरेंद्र गांगण | Updated: Mar 14, 2014, 08:34 PM IST

www.zee241taas.com, झी मिडीया, मुंबई
बांधकाममंत्री छगन भुजबळ संचालक असलेल्या, नाशिक येथील मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या व्यवहाराची मुंबई उच्च न्या़यालयानं दखल घेतलीये. याचिकाकर्त्यांनी केलेल्या आरोपांची शिक्षण शुल्क कमिटीने चौकशी करुन नियमानुसार कारवाई करावी असे आदेश मंबई उच्च न्यायालयानं दिलेत.
स्वातंत्र सैनिक बाळासाहेब जांभूळकर यांनी ही याचिका केली होती. विद्यार्थ्यांकडून घेतलेल्या फ़ी चा विश्वस्त गैरवापर करतात. गार्डीयन फ़ंड आणि टेक्निकल एज्युकेशन फंडच्या नावाखाली घेतलेले पैसे विश्वाताच्या खिशात जातात असा आरोप याचिकाकर्त्यांनी केलाय.
२०१० ते २०१२ या कालावधीत मॅनेजमेंट अभ्यासक्रमासाठी ४.०६ कोटी ख़र्च दाखवला. या कोर्सससाठी विद्यार्थ्यांकडून ८३ हजार ऐवजी १ लाख १५ हजार फ़ी घेतली होती. त्यानुसार अतिरिक्त १ कोटी १५ लाख रुपये मुंबई एज्युकेशन ट्रस्टच्या नाशिक विभागानं विद्यार्थ्यांकडून घेतल्याचा आरोप याचिकाकर्त्यांनी केलाय. या आरोपांची योग्य ती चौकशी करुन कारवाई करावी, असे आदेश कोर्टाने दिलेत.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.