भाजपने दाखवले मित्रपक्षांना गाजर, मंत्रिमंडळ विस्तार अशक्य

हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी चर्चा होती. मात्र आता अधिवेशनाआधी विस्तार होणार नसल्याचं स्पष्ट झाले आहे. मित्रपक्षांना गाजर दाखविल्याचे चर्चा आहे. त्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशन मुख्यमंत्र्यांसाठी जास्त तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत.

Updated: Dec 4, 2015, 11:34 PM IST
भाजपने दाखवले मित्रपक्षांना गाजर, मंत्रिमंडळ विस्तार अशक्य title=

मुंबई : हिवाळी अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार होणार अशी चर्चा होती. मात्र आता अधिवेशनाआधी विस्तार होणार नसल्याचं स्पष्ट झाले आहे. मित्रपक्षांना गाजर दाखविल्याचे चर्चा आहे. त्यामुळे आगामी हिवाळी अधिवेशन मुख्यमंत्र्यांसाठी जास्त तापदायक ठरण्याची चिन्हे आहेत.

भाजपचे वजनदार मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रिमंडळ विस्तार होणार हे नुसतं सांगितलं नाही, तर विस्ताराचा फॉर्म्युलाही जाहीर केला. त्यामुळे लाल दिव्यासाठी वर्षभर ताटकळत असलेल्या भाजपमधल्या इच्छुकांना आणि मित्रपक्षांनाही हायसे वाटले. भाजपने मित्रपक्षांची बैठक घेऊन, त्यांना कोणती मंत्रिपदं मिळतील याचंही सुतोवाच केले. मात्र, ते एक गाजर ठरलेय. 

मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी झालेल्या कोअर कमिटीच्या बैठकीत संभाव्य मंत्रिमंडळ विस्तारावर अखेरचा हात फिरवण्यात आला. एवढी सगळी तयारी झाल्यावर माशी नक्की शिंकली कुठे ? अधिवेशनाआधी मंत्रिमंडळ विस्तार का होत नाहीय, असे प्रश्न उपस्थित झालेत.

मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं का अडलं ?
- भाजपमध्ये इच्छुकांची संख्या जास्त
- प्रादेशिक न्याय देताना होणारी कसरत
- मुख्यमंत्र्यांना मान्य नसलेली विशिष्ट नावं
- मंत्रीपदासाठी दिल्लीत लॉबिंग
- महत्त्वाच्या खात्यांसाठी शिवसेनेचा दबाव
- मित्रपक्षांनी धरलेला खात्यांचा आग्रह

यामुळं मंत्रिमंडळ विस्ताराचं घोडं अडल्याची चर्चा आहे.

मनाजोगा विस्तार करता येणार नाही हे लक्षात आल्यामुळं मुख्यमंत्र्यांनीच तो पुढं ढकलल्याचं बोललं जात आहे. परिणामी भाजपमध्येच नव्हे तर मित्रपक्ष आणि शिवसेनेतही नाराजी निर्माण झाली. शिवसेनेने आधीच थेट हल्लाबोल करत भाजपमुळे मंत्रिमंडळ विस्तार लांबत असल्याची टीका केली होती. आता त्याला अधिक बळकटी मिळत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.