मुंबईत भाजपची बैठक, अमित शाह देणार कानपिचक्या?

भाजपाच्या महाजनसंपर्क अभियाना अंतर्गत भाजपाच्या पश्चिम विभागाची बैठक आज मुंबईत रंगशारदा इथे सुरू झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, शाह हे अनेकांना कानपिचक्या देण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

Updated: Jul 9, 2015, 12:57 PM IST
मुंबईत भाजपची बैठक, अमित शाह देणार कानपिचक्या? title=

मुंबई : भाजपाच्या महाजनसंपर्क अभियाना अंतर्गत भाजपाच्या पश्चिम विभागाची बैठक आज मुंबईत रंगशारदा इथे सुरू झाली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होत आहे. अमित शाह मुंबईत दाखल झाले आहेत. दरम्यान, शाह हे अनेकांना कानपिचक्या देण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.

या बैठकीला महाराष्ट्रासह गुजरात, गोवा, दिव-दमण, दादर नगर हवेली भागातील पदाधिकारी हजर आहेत. यामध्ये या भागातील भाजपाचे मुख्यमंत्री, मंत्री, खासदार, आमदार, जिल्हाप्रमुख आणि जिल्हासंपर्क प्रमुखही सहभागी झालेत. 

भाजपाने आता पक्षाच्या सदस्यापर्यंत पोहोचण्यासाठी आणि त्यामधून कार्यकर्ते तयार करण्यासाठी हे संपर्क अभियान सुरु केले आहे. असं असलं तरी या बैठकीव्यतिरिक्त राज्यात भाजप मंत्र्यांवर झालेले आरोप, शिवसेनेची होत असलेली टीका, मंत्रीमंडळ विस्तारासाठी येत असलेला दबाव यावर अमित शाह हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस किंवा इतर ज्येष्ठ मंत्र्यांशी चर्चा करणार का किंवा नव्याने काय सूचना करतात याकडे सर्वांचे लक्ष राहिले आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.