भाजप-राष्ट्रवादी नव्या युतीचा श्रीगणेशा

विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर झालाय... 45 विरूद्ध 22 मतांनी हा अविश्वास ठराव विधान परिषदेत संमत झाला. त्यामुळं काँग्रेसच्या वाट्याचा आणखी एक लाल दिवाही आता विझला आहे. 

Updated: Mar 16, 2015, 07:02 PM IST
भाजप-राष्ट्रवादी नव्या युतीचा श्रीगणेशा title=

मुंबई : विधान परिषदेचे सभापती शिवाजीराव देशमुख यांच्या विरोधातील अविश्वास ठराव मंजूर झालाय... 45 विरूद्ध 22 मतांनी हा अविश्वास ठराव विधान परिषदेत संमत झाला. त्यामुळं काँग्रेसच्या वाट्याचा आणखी एक लाल दिवाही आता विझला आहे. 

विशेष म्हणजे महाराष्ट्राच्या राजकारणात यानिमित्तानं नवं समीकरण पाहायला मिळालं. राष्ट्रवादीनं सभापतींच्या विरोधात मांडलेल्या या अविश्वास ठरावाला सत्ताधारी भाजपनं पाठिंबा दिला. 

राष्ट्रवादी आणि भाजप अशा नव्या राजकीय युतीला अविश्वास ठरावाच्या निमित्तानं सुरूवात झालीय. याउलट सत्ताधारी शिवसेनेनं मात्र मतदानामध्ये सहभाग घेतला नाही. 

अविश्वास ठरावावरील चर्चेच्या वेळी भाजप विरूद्ध शिवसेना असा संघर्षही पाहायला मिळाला. राष्ट्रवादीच्या अविश्वास ठरावाला पाठिंबा दिल्याबद्दल शिवसेना नेते रामदास कदम यांनी यावेळी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. भाजप आणि शिवसेना या सत्ताधारी पक्षांमधील संबंधांना तडा गेल्याचंही चित्र यानिमित्तानं अवघ्या महाराष्ट्राला दिसलं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.