भाजपला मदत केल्याने शिवसेनेला उपाध्यक्षपद

विधान परिषदेतील सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला अप्रत्यक्षरीत्या मदत केल्याच्या बदल्यात शिवसेनेला विधानसभेत बक्षिसी मिळण्याची शक्यता आहे. भाजप शिवसेनेला विधानसभेतील उपाध्यक्षपद देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

Updated: Mar 21, 2015, 12:04 PM IST
भाजपला मदत केल्याने शिवसेनेला उपाध्यक्षपद title=

मुंबई : विधान परिषदेतील सभापतीपदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादीला अप्रत्यक्षरीत्या मदत केल्याच्या बदल्यात शिवसेनेला विधानसभेत बक्षिसी मिळण्याची शक्यता आहे. भाजप शिवसेनेला विधानसभेतील उपाध्यक्षपद देणार असल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. 

शिवसेनेनं विधान परिषदेच्या निवडणुकीत निलम गो-हेंची उमेदवारी जाहीर केली होती. मात्र ऐन निवडीच्या काही क्षण आधी भाजपसह शिवसेनेनं मतदानावर बहिष्कार जाहीर केला. यामुळं भाजपसमोरचा पेच सुटला. तसंच राष्ट्रवादीच्या उमेदवाराचा विजयही सुकर झाला.

शिवाजीराव देशमुख यांच्याविरोधात अविश्वास ठराव मंजूर झाल्यानंतर, आता रामराजे निंबाळकर यांच्याकडे विधानपरिषद सभापतीपदी निवड झाली आहे. फलटणचे आमदार असलेले रामराजे निंबाळकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी मंत्री आहेत. फलटणमधून १९९५ साली ते पहिल्यांदा अपक्ष म्हणून निवडून आले, त्यानंतर त्यांनी युती सरकारच्या काळात राज्यमंत्रीपदाचा कार्यभार सांभाळला.

१९९९ साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाल्यानंतर, ते राष्ट्रवादीत दाखल झाले. १९९५ पासून ते २००९ सालापर्यंत ते फलटणचे आमदार होते. २००९ साली मतदारसंघ राखीव झाल्यानंतर, त्यांची विधान परिषदेत वर्णी लागली. शरद पवार यांचे निकटवर्तीय अशीही त्यांची ओळख आहे. आघाडी सरकारच्या काळात त्यांनी जलसंपदा विभागाचा कृष्णा खोरेचा कार्यभारही सांभाळला.        

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.