भाजप-सेना वादावर तूर्तास पडदा!

भाजप - सेनामधील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमिवर दोन्ही पक्षांनी अखेर वादावर पडदा टाकण्याची भूमिका घेतलीय. 

Updated: Oct 15, 2015, 05:44 PM IST
भाजप-सेना वादावर तूर्तास पडदा!  title=

मुंबई : भाजप - सेनामधील वाढत्या वादाच्या पार्श्वभूमिवर दोन्ही पक्षांनी अखेर वादावर पडदा टाकण्याची भूमिका घेतलीय. 

लोकसभा निवडणुकीनंतर गेल्या अनेक दिवसांपासून शिवसेना - भाजपमधील धुसपूस अनेकदा चव्हाट्यावर आलेली दिसली. या पार्श्वभूमीवर बुधवारी शिवेसेनेची मंत्री आणि मुख्यमंत्री यांच्यामध्ये झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय घेण्यात आलाय.

अधिक वाचा - शिवसेना-भाजप बहिष्कार सिलसिला कायम, सेनेनंतर आता भाजपची बारी

गेल्या काही दिवसांत बाबासाहेब आंबेडकर स्मारक भूमिपूजन असो, पाकिस्तानचे माजी परराष्ट्रमंत्री यांच्या पुस्तक प्रकाशनचा कार्यक्रम असो, 'सामना'मधून सरकारवर टीका असो किंवा दुष्काळ कर लावण्याची सरकारची भूमिका... या सगळ्याच मुद्द्यांवरून भाजप सेनेच्या नेत्यांमध्ये चांगलीच जुपल्याचं चित्र बघायला मिळालं.

अधिक वाचा - सुवर्ण महोत्सवी दसरा मेळाव्यासाठी शिवसेनेला यंदाही हवंय 'शिवाजी पार्क'

मुख्य म्हणजे सरकारच्या वर्षपूर्तीच्या पार्श्वभूमीवर हा वाद वाढला. त्यामुळे विरोधकांना आयतं कोलीतही मिळतंय. तेव्हा सेना-भाजपमधील संबंध जास्त ताणले जाऊ नयेत, यासाठी अखेर दोन्ही पक्षांकडून एक-एक पाऊल मागं घ्यायचं ठरवलंय. 

म्हणूनच, भाजपच्या आजच्या बैठकीत नेत्यांमध्ये खदखदत असलेला शिवसेनाविरोध म्यान करण्यात आलेला दिसला.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.