भाजपनं मागे घेतली ती जाहिरात

दोन दिवसांपूर्वी भाजपच्या मुंबईतल्या प्रचारासाठी जारी करण्यात आलेली एक जाहिरात मागे घेण्याची वेळ आज मुंबई भाजपवर आलीय.

Updated: Feb 18, 2017, 05:55 PM IST
भाजपनं मागे घेतली ती जाहिरात title=

मुंबई : दोन दिवसांपूर्वी भाजपच्या मुंबईतल्या प्रचारासाठी जारी करण्यात आलेली एक जाहिरात मागे घेण्याची वेळ आज मुंबई भाजपवर आलीय. चल हट, भाजप अँड मुंबई मेड फॉर इच अदर अशी ही जाहिरात आज मागे घेण्यात आलीय.

ही जाहीरात प्रसिद्ध होताच, सोशल मीडियावर नकारात्मक प्रतिक्रिया आल्या. त्याचप्रमाणे भाजपच्या वरिष्ठ नेत्यांना सुद्धा ही जाहिरात  रुचली नाही, म्हणून आता ही जाहिरात मागे घेण्यात आलीय.

जाहिरात तयार करताना जे काम करतात त्यांना राजकीय, सामाजिक भावना लक्षात येत नाही. एखादी जाहिरात चुकीची आढळली तर मागे घेतो, अशी प्रतिक्रिया भाजपचे प्रवक्ते माधव भांडारी यांनी दिली आहे.