शेलारांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची आज बैठक

मुंबईत आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची दुपारी तीन वाजता बैठक बोलावण्यात आलीये.

Updated: Feb 27, 2017, 09:05 AM IST
शेलारांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची आज बैठक title=

मुंबई : मुंबईत आशिष शेलार यांच्या अध्यक्षतेखाली भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची दुपारी तीन वाजता बैठक बोलावण्यात आलीये.

दादर येथील भाजप कार्यलयात ही बैठक आयोजित करण्यात आली असून बैठकीला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित रहाणार आहेत. 

तर दुसरीकडे औरंगाबादेत जिल्हा परिषदेत काय करावं यासाठी शिवसेना आणि भाजप स्वतंत्रपणे बैठका घेणार आहेत. 

मुंबई महापालिकेत भाजप आणि शिवसेना या दोन्ही पक्षांना स्पष्ट बहुमत न मिळाल्याने सत्ता स्थापनेचा तिढा कायम आहे. तसेच महापौरपदी कोणत्या पक्षाच्या नगरसेवकाची वर्णी लागणार आहे हेही 9 मार्चला ठरणार आहे.