गडकरी, राणेंना उद्धव ठाकरे यांनी केले जय महाराष्ट्र!

महापालिकेत शिवसेना आणि भाजप यांची युती होणार का, याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. 

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Feb 25, 2017, 02:48 PM IST
गडकरी, राणेंना उद्धव ठाकरे यांनी केले जय महाराष्ट्र! title=

मुंबई : महापालिकेत शिवसेना आणि भाजप यांची युती होणार का, याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. यातच  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी मीडियाशी बोलताना सावध भूमिका घेत, जय महाराष्ट्र म्हणत पुढे निघून गेलेत. त्यांनी युतीबाबत भाष्य टाळलं.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चर्चा करून सन्मानपूर्वक मार्ग काढला तर यात मुंबई, राज्य, भाजप आणि शिवसेनेचे हित आहे. यावेळी भाजप आणि शिवसेना बरोबरीत आहेत. विचार आणि हिंदुत्वाच्या आधारावर भाजप आणि शिवसेनेत मतभेद नाही. निवडणूक काळात जे झाले ते सोडून द्यावे लागेल, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले होते. त्यामुळे भाजपकडून युतीसाठी प्रस्ताव असल्याचे दिसत आहे.

तर दुसरीकडे नितीन गडकरी आणि काँग्रेस नेते नारायण राणे यांच्याबाबत प्रतिक्रिया न देता उद्धव ठाकरे यांनी 'जय महाराष्ट्र' केला. मात्र, काँग्रेस प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण यांच्या भूमिकेबाबत सावध भाष्य केले, आता थांबा जरा इतकी काय घाई आहे. त्यामुळे मुंबईत युती होणार की नाही, याबाबत आता उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.