मध्य रेल्वे मार्गावर वाहतुकीचा खोळंबा

मध्य रेल्वे मार्गावरील वाहतुकीचे विघ्न काहीकेल्या दूर होत नाही. आज सकाळी पुन्हा एकदा प्रवाशांना एकाच ठिकाणी ३० ते ४० मिनिटे रखडावे लागले. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने नोकरीसाठी जाणाऱ्यांचे हाल झालेत.

Updated: Sep 11, 2014, 12:13 PM IST
मध्य रेल्वे मार्गावर वाहतुकीचा खोळंबा title=

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील वाहतुकीचे विघ्न काहीकेल्या दूर होत नाही. आज सकाळी पुन्हा एकदा प्रवाशांना एकाच ठिकाणी ३० ते ४० मिनिटे रखडावे लागले. सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने नोकरीसाठी जाणाऱ्यांचे हाल झालेत.

गेल्या काही दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावर वारंवार तांत्रिक बिघाडांत वाढ होत आहे. या बिघाडामुळे मध्य रेल्वेच्या वाहतुकीचा खोळंबा आज गुरूवारी सकाळी पुन्हा एकदा अनुभवण्यास मिळाला. 

मध्य रेल्वेच्या शहाड आणि कल्याण या स्थानकांदरम्यान सिग्नल यंत्रणेत बिघाड झाल्याने मुंबईकडे जाणाऱ्या वाहतुकीची कोंडी झाली. रेल्वेच्या गाड्या २० ते २५ मिनिटे उशीराने धावत  होत्या.  गेल्या काही दिवसांत रूळाला तडे जाणे, ओव्हरहेड वायर तुटणे यामुळे वाहतुकीवर परिणाम होत असून प्रवाशी त्रस्त झाले आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.