मध्य रेल्वेला पाच वर्षानंतर मिळणार नवी लोकल

मुंबईत मध्य रेल्वेला तब्बल पाच वर्षांनंतर नवीन लोकल मिळणार आहे. 

Updated: Dec 26, 2016, 11:36 PM IST
मध्य रेल्वेला पाच वर्षानंतर मिळणार नवी लोकल title=

मुंबई : मुंबईत मध्य रेल्वेला तब्बल पाच वर्षांनंतर नवीन लोकल मिळणार आहे. जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात हे डबे मुंबईत दाखल होणार आहेत अशी माहिती मध्य रेल्वेतील सुत्रांनी दिली आहे.

मध्य रेल्वेला यापूर्वी 2011 मध्ये नवीन लोकल मिळाली होती. गेल्या पाच वर्षात मध्य रेल्वेला नविन लोकल मिळण्याची ही पहिलीच वेळ आहे. बम्बार्डीयर लोकल अजूनही सेंट्रलच्या प्रवशांच्या नाशिबात नाही. कारण नविन लोकल देखील सीमेन्स लोकल आहे. मध्य रेल्वेला सध्या पश्चिम रेल्वेवर वापरलेल्या जुन्या लोकल दिल्या जातात.