मुंबई टोलचा निर्णय नाही, मुलुंड टोलनाक्यावर काँग्रेसचं आंदोलन

राज्यातील एकूण ६५ टोलनाक्यांबाबत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. राज्यातील १२ टोलनाके पूर्णपणे बंद आणि ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट देण्यात आलीय. मात्र यात सर्वाधिक लूट होणाऱ्या मुंबई एंट्री पॉईंटच्या टोलचा समावेश नसल्याच्या विरोधात काँग्रेसनं आज मुलुंड टोलनाक्यावर आंदोलन केलंय.

Updated: Apr 10, 2015, 04:08 PM IST
मुंबई टोलचा निर्णय नाही, मुलुंड टोलनाक्यावर काँग्रेसचं आंदोलन title=

मुंबई: राज्यातील एकूण ६५ टोलनाक्यांबाबत महत्त्वाचा निर्णय राज्य सरकारनं घेतलाय. राज्यातील १२ टोलनाके पूर्णपणे बंद आणि ५३ टोलनाक्यांवर छोट्या वाहनांना सूट देण्यात आलीय. मात्र यात सर्वाधिक लूट होणाऱ्या मुंबई एंट्री पॉईंटच्या टोलचा समावेश नसल्याच्या विरोधात काँग्रेसनं आज मुलुंड टोलनाक्यावर आंदोलन केलंय.

ज्या एमईपीची वसुली दुपटीहून अधिक झाली आहे तिथं मात्र, टोल रद्द करण्याचा सरकारचा कुठलाही विचार नाही. मुंबई-पुणे टोलबाबत ३१ जुलैपर्यंत निर्णय घेऊ, असं मुख्यमंत्र्यांनी जाहीर केलं. मात्र मुलुंड टोलनाक्यावर काँग्रेसकडून जोरदार आंदोलन करण्यात आलं. काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुंबईक़डे जाणारी वाहतूक रोखून धरल्यानं वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या.
 
या आंदोलनामुळं टोलनाक्यावर काही वेळ तणावाचं वातावरण होतं.

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.