काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा भाजप प्रवेश

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला महाराष्ट्रात दणक्यावर दणके बसतायेत. आज मुंबईत अमित शहांच्या उपस्थितीत भव्य कार्यकर्ता मेळावा झाला. या मेळाव्यात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांनी अमित शहांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश केलाय. 

Updated: Sep 5, 2014, 08:27 AM IST
काँग्रेस-राष्ट्रवादीच्या बड्या नेत्यांचा भाजप प्रवेश title=

मुंबई: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या उपस्थितीत काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीच्या बड्या नेत्यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला.

काँग्रेसचे माजी खासदार भास्करराव खतगावकर, राष्ट्रवादी काँग्रेसच्या माजी मंत्री सूर्यकांता पाटील आणि बबनराव पाचपुते, माजी आमदार माधवराव किन्हाळकर आदी दिग्गजांनी भाजपचा झेंडा खांद्यावर घेतला. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर या नेत्यांच्या प्रवेशामुळं भाजपची ताकद आणखी वाढलीय.

भाजपचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात आज भाजपच्या निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा झाला, असं अमित शहा म्हणाले. तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस सरकारवर अमित शहा यांनी आणि देवेंद्र फडणवीसांनी सडेतोड टीका केली.  

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.