राष्ट्रगीताला उभे न राहिल्यानं सिनेमागृहातून हाकललं

मुंबईतील कुर्ला येथे पीव्हीआर चित्रपट गृहात तमाशा चित्रपटाच्या सुरुवातीला राष्ट्रगीता करता उभे न राहणा-या परीवाराला सिनेमा गृहात बाहेरचा रस्ता दाखवला गेला. याची एक व्हिडिओ क्लीप व्हायरल झालीये. 

Updated: Nov 30, 2015, 09:31 AM IST
राष्ट्रगीताला उभे न राहिल्यानं सिनेमागृहातून हाकललं title=

मुंबई : मुंबईतील कुर्ला येथे पीव्हीआर चित्रपट गृहात तमाशा चित्रपटाच्या सुरुवातीला राष्ट्रगीता करता उभे न राहणा-या परीवाराला सिनेमा गृहात बाहेरचा रस्ता दाखवला गेला. याची एक व्हिडिओ क्लीप व्हायरल झालीये. 

या क्लीप मध्ये चित्रपट स्क्रीन समोर गर्दीत गदारोळ करणारी प्रेक्षक दिसतायेत. त्यास सर्वात पुढे एक व्यक्ती चित्रपट गृहातील सीटवर बसलेल्या एका व्यक्तीला तो राष्ट्रगीताला उभा का राहिला नाही हा जाब विचारला गेला. शेवटी वाद वाढू लागला.  
चित्रपट गृहातील सर्व प्रेक्षकांनी मिळून राष्ट्रगीताला उभं न राहणाऱ्या  दाम्प्त्याला चित्रपटगृहाबाहेर काढलं. हे दाम्पत्य चित्रपट गृहाबाहेर जाताच चित्रपट गृहातील उपस्थित लोकांनी टाळ्या वाजवून राष्ट्रगिताला उभे न राहणा-या दाम्प्त्याला जाब विचारायला गेलेल्या व्यक्तीचा गौरव केला.

पाहा हा व्हिडिओ - 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.