सोने दर घसरूनही खरेदीकडे ग्राहकांची पाठ

देशात सोने किमतीत घट झाली तरीही सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा उत्साह दिसून येत नाही. गेल्या काही दिवसांत सोने किंमतीत कमालीची घसरण झाली आहे. त्याची अनेक कारणे दिसून येत आहेत.

Surendra Gangan सुरेंद्र गांगण | Updated: Jan 15, 2014, 01:59 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
देशात सोने किमतीत घट झाली तरीही सोने खरेदी करण्यासाठी ग्राहकांचा उत्साह दिसून येत नाही. गेल्या काही दिवसांत सोने किंमतीत कमालीची घसरण झाली आहे. त्याची अनेक कारणे दिसून येत आहेत.
प्रति तोळे सोने २९,५०० रूपये असा दर होता. मात्र, या दरात घसरण झाली आहे. तरीही सोने खरेदीसाठी ग्राहकांची पाठ दिसून येत आहे. डॉलरच्या तुलनेत रूपया मजबूत झाल्याने सोने खरेदीला प्रतिसाद मिळत नाही, असे सध्या दिसून येत आहे.
२०१२मध्ये सोने दरात आंतरराष्ट्रीय बाजारात मोठ्याप्रणात घसरण झालेली पाहायला मिळाली होती. १२०० डॉलरने सोने दर खाली आलेत. मात्र, भारतात त्याचा परिणाम जाणवला नाही. कारण भारत सरकारने सोने आयातीवर करमूल्य (टॅक्स) लागू केले होते. तसेच डॉलरच्या तुलने रुपयाची होणारी घसरणही त्याला कारणीभूत ठरली. आंतरराष्ट्रीय घडामोडींचा परिणाम हा सोने किंमतीवर दिसून येत आहे. असे असताना भारतात सोने खरेदीकडे ग्राहकांनी पाठ दिसतेय.
गतीवर्षी जानेवारी महिन्यापेक्षा मार्केटमध्ये तेजी नाही. ग्राहक सोने खरेदी करण्याबाबत अधिक जागृत झाला आहे. तसेच वाढती महागाई आणि अन्य वस्तू किंमतीमध्ये झालेली घट यामुळे सोने खरेदी करण्याकडे ग्राहकांचा कम कमी दिसून येत आहे, असे ऑल इंडिया जेम अॅण्ड ज्वेलरी ट्रेड फेडरेशनचे अध्यक्ष हरेश सोनी यांनी व्यक्त केले आहे.
केंद्र सरकारने सोने पुरवठ्यावर प्रतिबंध लागू केले आहेत. त्यामुळे सराफा व्यावसायिकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांकडे सोने कमी प्रमाणात आहे. तसेच जास्त नुकसान होत आहे. त्यामुळे सरकारने सोने पुरवठ्यावर लागू केलेले प्रतिबंध उठविले पाहिजेत, अशी मागणी सराफा व्यावसायिकांनी केली आहे.
सोने आयात करण्यावर लागू केलेला कर तात्काळ हटवला पाहिजे. यामुळे व्यावसाय करण्यावर बंधने येत आहेत. सध्या युवा वर्ग सोने खरेदी करण्यापेक्षा महागड्या इलेक्ट्रॉनिक वस्तू, मोबाईल, गॅझेट खरेदी करण्याला पहिली पसंती देत आहेत. त्यामुळे सोने खरेदीत घट पाहायला मिळत आहे.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.