राज ठाकरेंनी केले पक्षात फेरबदल, युवा कार्यकर्त्यांना संधी

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता आपल्या युवा सहकाऱ्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यानी पक्षात फेरबदल सुरु केले आहेत.

Updated: Jan 17, 2015, 07:49 PM IST
राज ठाकरेंनी केले पक्षात फेरबदल, युवा कार्यकर्त्यांना संधी title=

मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आता आपल्या युवा सहकाऱ्यांना पक्षाच्या मुख्य प्रवाहात संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार त्यानी पक्षात फेरबदल सुरु केले आहेत.

ठाणे शहर संपर्क अध्यक्ष म्हणून अभिजीत पानसे तर अविनाश जाधव यांची ठाणे शहर अध्यक्ष आणि रवी मोरे यांची ठाणे उपशहर अध्यक्षपदी आज नियुक्ती केली. याआधी पानसे यांची मनसे चित्रपट कर्मचारी सेनेच्या प्रमुख सल्लागर पदावर अलिकडेच नेमणूक करण्यात आली आहे.

राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री देवेन्द्र फडणवीस यांची विद्यार्थ्यांचे दप्तर ओझे विषयासंदर्भात भेट घेतली होती. त्यावेळी राज ठाकरे यांनी आवर्जुन पानसे यांनाही सोबत घेतले होते. यावेळी पक्षाच्या प्रमुख नेत्यांना बरोबर घेण्याचे टाळले होते.

तसेच मनसेच्या रेल्वे कामगार सेनेचे अध्यक्ष म्हणून सुनील हर्षे यांची नियुक्ती केली आहे. शशांक नागवेकर यांची चित्रपट कर्मचारी सेनेच्या सरचिटणीस पदावर नेमणूक करून संघतनेतील प्रस्थापितांवर वचक ठेवण्याची खेळी केली आहे.

प्रमुख नेत्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देऊन पक्षाला जय महारष्ट्र केल्याने त्यानच्या रिक्त जागेवरही लवकरच नव्या नेमणूका करण्यात येणार  असल्याचे सांगण्यात येते आहे. विधानसभा निवडणुकीतील परभवनंतर राज ठाकरे नव्याने पक्ष बांधणी करण्यासाठी कार्यकर्त्यांशी संवाद साधत आहेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.