मुंबई : ओम माथूर यांच्या घरी झालेल्या बैठकीनंतर आज शिवसेना नेते मीडियासमोर आले... शिवसेनेला अजूनही 'महायुती' हवीय, पण भाजपलाच महायुती तोडायची घाई झालीय, असं दिवाकर रावते यांनी म्हटलंय.
'महायुतीचं गाडं केवळ एका जागेच्या अदलाबदलीच्या प्रश्नावर अडलंय... याच प्रश्नावर तोडगा काढण्यासाठी आम्ही दोन - अडीच तास रुडी यांची वाटत पाहत होतो... पण, राजीव प्रताप रूडींनी आमच्याशी चर्चाही केली नाही' असं शिवसेनेच्या दिवाकर रावते यांनी म्हटलंय. भाजपनं सेनेचा योग्य सन्मान राखला नाही... भाजपनं आमच्याशी चर्चा न करणं... आमची भेट न घेता निघून जाण, हे खेदजनक असल्याचं देखील रावते यांनी स्पष्टपणे म्हटलंय.
काही मागण्या मान्य झाल्यावर युती जाहीर करण्याची मागणी भाजपनं केली होती... पण, भाजपच्याच रुडी नावाच्या माणसानं परस्पर युती तुटण्याच्या बातम्या मीडियात पसरवल्या, असंही दिवाकर रावते यांनी म्हटलंय. समोरासमोर चर्चा न करता 'महायुती' तुटण्याच्या बातम्या मीडियात पसरवणं योग्य नाही... आम्ही यादी बनवत होतो... आणि आम्हाला मीडियातून समजलं भाजपनं महायुती तुटल्याच्या बातम्या पसरवल्यात, असंही त्यांनी म्हटलंय.
युती ठेवायची किंवा नाही याचा निर्णय भाजप एकतर्फी घेणार असेल तर उद्धव ठाकरेंचं उत्तर याला योग्य उत्तर देईलच पण, सेना अजूनही महायुती टिकवण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं रावते यांनी म्हटलंय.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.