लालबाग गणेशोत्सव मंडळाचा आडमुठेपणा कायम, दंड कधी भरणार?

लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला मुंबई महापालिकेनं यंदाही चांगलाच दणका दिलाय. लालबागचा राजा मंडळाला मंडपामुळे पडलेल्या खड्ड्यांसाठी मुंबई महापालिकेनं यंदाच्या वर्षी तब्बल 3 लाख 36 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय... एरव्ही उत्साह दाखवणाऱ्या मंडळाची दंड भरण्यासाठी मात्र तयारी नाही.

Updated: Sep 30, 2015, 09:44 AM IST
लालबाग गणेशोत्सव मंडळाचा आडमुठेपणा कायम, दंड कधी भरणार?  title=

मुंबई : लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला मुंबई महापालिकेनं यंदाही चांगलाच दणका दिलाय. लालबागचा राजा मंडळाला मंडपामुळे पडलेल्या खड्ड्यांसाठी मुंबई महापालिकेनं यंदाच्या वर्षी तब्बल 3 लाख 36 हजार रुपयांचा दंड ठोठावलाय... एरव्ही उत्साह दाखवणाऱ्या मंडळाची दंड भरण्यासाठी मात्र तयारी नाही.

उल्लेखनीय म्हणजे, लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळाला अशाप्रकारे दंड होण्याची ही पहिलीच वेळ नाहीय. वर्ष 2012 पासून या मंडळावर दरवर्षी खड्ड्यांसाठी दंड ठोठावण्यात आलाय. पण, प्रचंड दान मिळूनही मंडळानं मात्र अद्याप हा दंड भरलेला नाही, हे विशेष...   

पाहुयात, याआधी किती दंड ठोठावण्यात आला होता... 
2012 - 23,56,000 
2013 - 5,60,638
2014 - 5,61,182
2015 - 3,36,000

म्हणजेच, वर्ष 2012 पासून या मंडळाकडे 38 लाख , 13 हजार, 820 रुपये इतकी रक्कम थकीत आहे. वर्षांनुवर्ष केवळ नोटीसा पाठवून लालबागचा राजा गणेश मंडळाकडून त्याला सकारात्मक उत्तर मिळालेलं नाही.

अधिक वाचा - पाहा, लालबागच्या राजाची कमाई  

त्यामुळे, तूर्तास जर दंड भरला नाही तर मंडळाची अनामत रक्कम जप्त करु, असं पालिकेनं म्हटलंय. मात्र, मंडळांचे डिपॉझिट हे अगदीच तुटपुंजे म्हणजे 25 हजारांचं आहे. त्यामुळे, आता लालबागचा राजा गणेशोत्सव मंडळावर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली जातेय. अतिरीक्त महापालिका आयुक्त एस. व्ही. आर श्रीनिवास यांनी कारवाईचे संकेतही दिलेत. 

व्हिडिओ - लालबागच्या राजाच्या दरबारात पोलिसाकडून तरुणीला मारहाण

कोट्यावधीच्या देणग्या जमा करणारे मंडळांच्या चुकांचा भार महापालिकेलाच उचलावा लागत असून राजकीय दबावामुळंच आतापर्यंत या मंडळाला अभय मिळत असल्याचं दिसून येतंय.  

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.