व्हिडिओ - लालबागच्या राजाच्या दरबारात पोलिसाकडून तरुणीला मारहाण

लालबागच्या राजाचा आज सकाळीच विसर्जन झालंय. मुंबईत प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाच्या दरबारात लाखोंच्या संख्येनं भाविक या 10 दिवसांत दर्शनासाठी येतात. सुरक्षेसाठी तिथं पोलीस कर्मचारीही उपस्थित असतात. पण दर्शनासाठी आलेल्या एका तरुणीला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय.

Updated: Sep 28, 2015, 04:26 PM IST
व्हिडिओ - लालबागच्या राजाच्या दरबारात पोलिसाकडून तरुणीला मारहाण title=

मुंबई: लालबागच्या राजाचा आज सकाळीच विसर्जन झालंय. मुंबईत प्रसिद्ध असलेल्या लालबागच्या राजाच्या दरबारात लाखोंच्या संख्येनं भाविक या 10 दिवसांत दर्शनासाठी येतात. सुरक्षेसाठी तिथं पोलीस कर्मचारीही उपस्थित असतात. पण दर्शनासाठी आलेल्या एका तरुणीला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडलीय. मारहाणीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर वायरल झालाय. दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याप्रकरणी चौकशीचे आदेश दिले आहेत. 

2013मध्येही लालबागच्या राजाचे स्वयंसेवक महिला आणि इतर भाविकांसोबत कसे असभ्यपणे वागतात, हे दृश्य झी मीडियानं आपल्याला दाखवले होते. त्यानंतर आता ही घडलेली घटना... 25  तारखेला नंदिनी गोस्वामी नावाची तरुणी आपल्या आई-वडिलांसह लालबाग राजाच्या दर्शनाला गेली होती. तिथं दर्शन तर दूरच राहिलं पण महिला पोलीस कॉन्स्टेबलनं तिला बेदम मारहाण केली. 25 तारखेला रात्री 2 वाजता दरम्यानची ही घटना.

आणखी वाचा - 'लालबागच्या राजा'चं दर्शन घ्यायचंय, असं पोहोचावं लालबागला...

या प्रकरणाची काळाचौकी पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करण्यात आली. पोलीस कॉन्स्टेबलनंच पीडित तरुणींवर असभ्य वर्तनाचा आरोप करत 1200 रुपयांचा दंड ठोठावला. 

त्या तरुणीची चूक असो किंवा नसो पण अशाप्रकारे मारहाण करणं हे योग्य आहे का? आपणच हा व्हिडिओ पाहून ठरवा. 

 

पाहा हा व्हिडिओ -

आणखी वाचा - लालबाग राजाच्या दर्शनाला रेल्वे तिकीट काढूनच या, नाही तर...

 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.