मोबाईलनं घेतला मुलीचा बळी!

By Shubhangi Palve | Last Updated: Tuesday, June 4, 2013 - 13:11

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
मोबाईलवर बोलताना किंवा गाणी ऐकत रस्ता ओलांडणं किती महागात पडू शकतं, याचा प्रत्यय मुंबईत आलाय.
निधी पांडे या १७ वर्षांच्या तरुणीचा बसनं उडवल्यामुळे बळी गेलाय. दादरच्या खोदादाद सर्कलला ही दुर्घटना घडलीय. रस्ता ओलांडत असताना निधी कानात मोबाईलचा ईअरफोन लावून त्यावर गाणी ऐकत चालली होती. याचवेळी पाठिमागून लक्झरी बस भरधाव वेगात आली. ड्रायव्हरनं निधीला पाहिलं त्यानं हॉर्नही दिला. मात्र, कानात इअरफोन असल्यानं तिला हॉर्नचा आवाजच ऐकू आला नाही.
बसनं वारंवार हॉर्न वाजवूनही निधी सावध झाली नाही... ड्रायव्हरही वेळेतच गाडीचा ब्रेक लावण्यात अपयशी ठरला. आणि निधीला या भरधाव बसची जोरदार धडक बसली. यात तिचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, बसच्या ड्रायव्हरला अटक करण्यात आलीय.
इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.

First Published: Tuesday, June 4, 2013 - 12:27
comments powered by Disqus