मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, म्हाडाची जाहिरात प्रसिद्ध

मुंबईतल्या म्हाडाच्या  ९७२ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. २३ जून ते २३ जुलैपर्यंत या घरांसाठीचे अर्ज मिळणार आहेत.

Updated: Jun 22, 2016, 08:32 AM IST
मुंबईत घर घेणाऱ्यांसाठी खुशखबर, म्हाडाची जाहिरात प्रसिद्ध title=

मुंबई : मुंबईतल्या म्हाडाच्या  ९७२ घरांसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. २३ जून ते २३ जुलैपर्यंत या घरांसाठीचे अर्ज मिळणार आहेत. (जाहिरात बातमीच्या शेवटी पाहा)
 
ऑनलाइन अर्ज २४ जून ते २५ जुलै दरम्यान भरता येणार आहेत. तर २४ जून ते २७ जुलैपर्यंत बैंकेमध्ये डी डी भरता येईल. १० ऑगस्टला या घरांच्या लॉटरीचा निकाल आहे. सर्वात स्वस्त घर अत्यल्प उत्पन्न गट मालवणी मालाडमध्ये आहे. त्याचा कार्पेट एरिया १६.७२ चौरस मीटर इतका आहे. तर त्याची किंमत ८ लाख १७ हजार इतकी आहे.

सर्वात महाग घर उच्च उत्पन्न गटातलं शैलेन्द्र नगर दहिसरमध्ये आहे. कारपेट एरिया ७८.४७ चौरस मीटर असलेल्या या घराची किंमत ८३ लाख ८६ हजार इतकी आहे.