'बोनस मिळाला नाही तर बेस्ट बस बंद'

यंदा दिवाळीचा बोनस दिला नाही, तर तीन दिवस काम बंद करण्याचा इशारा बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी दिलाय.

Updated: Oct 14, 2015, 10:22 PM IST
'बोनस मिळाला नाही तर बेस्ट बस बंद' title=

मुंबई : यंदा दिवाळीचा बोनस दिला नाही, तर तीन दिवस काम बंद करण्याचा इशारा बेस्टच्या कर्मचाऱ्यांनी दिलाय.

मागणी मान्य झाली नाही, तर २५ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीपासून तीन दिवस संपावर जाण्याचा निर्णय कर्मचारी संघटनेनं घेतलाय. 

बेस्टच्या परिवहन उपक्रमाला सुमारे ६५ कोटी रुपयांचा नफा झाला आहे. त्यामुळे आधीच दिलेलं बोसनचं आश्वासन प्रशासनानं पाळवं अशी संघटनेची मागणी आहे.

बेस्टच्या कर्मचाऱ्यांची २५ ऑक्टोबरला परळच्या कर्मचाऱ्याची जाहीर सभा होईल. तोपर्यंत सानुग्रह अनुदान जाहीर झालं नाही, तर त्याच रात्री संपावर जाऊ असं संघटनेनं म्हटलय.

बोनसच्या मागणीसाठी बेस्ट कामगार सेना, बेस्ट वर्कर्स युनियन, बेस्ट इलेक्ट्रिकल वर्कर्स यांच्यासह सर्वच संघटना एकत्र आल्यात. त्यामुळे बोनससाठी पुन्हा एकदा मुंबईकरांना वेठीस धरण्याची तयारी सुरू झालीय.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.