शिवाजी पार्कात बाळासाहेबांच्या पुतळ्याची गरज नाही - जयदेव

शिवाजी पार्क हे मैदानच राहिले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनी मांडलीय.

Shubhangi Palve शुभांगी पालवे | Updated: Nov 17, 2013, 02:29 PM IST

www.24taas.com, झी मीडिया, मुंबई
शिवाजी पार्क हे मैदानच राहिले पाहिजे अशी स्पष्ट भूमिका शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे पुत्र जयदेव ठाकरे यांनी मांडलीय.
बाळासाहेब आणि शिवसैनिकांचं वेगळं नातं होतं. बाळासाहेब आजही शिवसैनिकांच्या हृदयात आहेत. त्यामुळं शिवाजी पार्कवर बाळासाहेबांचा पुतळा उभारण्याची गरज नाही, अशी भूमिका जयदेव यांनी मांडलीय. शिवाजी पार्कवर छत्रपती शिवाजी महाराजांशिवाय कुणाचाही पुतळा नको, असं जयदेव यांनी म्हटलंय.
याशिवाय महालक्ष्मी रेसकोर्सवरुन सुरु असलेल्या राजकारणावरही जयदेव यांनी नाराज व्यक्त करत विरोध दर्शवलाय. महालक्ष्मीवर कोणतंही उद्यान करण्यास जयदेव यांचा विरोध आहे. मुंबईत मोकळ्या जागा कमी आहेत. थीम पार्कमुळे रेसकोर्सवर आणखी एक बांधकाम होईल, असं जयदेव ठाकरे यांनी म्हटलंय.
उद्धव आणि राज या ठाकरे बंधुंवरही जयदेव यांनी भाष्य केलंय. दोघांमध्ये समन्वय साधण्याची गरज नाही. दोघांना हवं तेव्हा एकत्र येतील, अशी भूमिकाही त्यांनी मांडलीय. तसंच दसरा मेळाव्यातल्या अपमाननाट्याला मनोहर जोशीच जबाबदार असल्याचा टोला जयदेव यांनी हाणलाय.
जयदेव यांच्या या वक्तव्यामुळे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या महत्वाकांक्षी थीम पार्कला सरळ सरळ विरोध केल्याचं चित्र निर्माण झालंय.

इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.