कपिल शर्माच्या घरावर मनसे कार्यकर्ते धडकलेत

कॉमेडियन कपिल शर्माच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा मनसे कार्यकर्त्यांचा डाव फसला. शुक्रवारी रात्री उशीरा कॉमेडियन कपिल शर्माला लक्ष्य करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याच्या घरासमोर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

Updated: Sep 10, 2016, 09:26 AM IST
कपिल शर्माच्या घरावर मनसे कार्यकर्ते धडकलेत title=

मुंबई : कॉमेडियन कपिल शर्माच्या घराबाहेर आंदोलन करण्याचा मनसे कार्यकर्त्यांचा डाव फसला. शुक्रवारी रात्री उशीरा कॉमेडियन कपिल शर्माला लक्ष्य करत गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, त्याच्या घरासमोर पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे.

कपिलच्या घराबाहेर गोंधळ घालून त्याला घाबरवण्याचा आणि मानसिक दबाव आणण्याचा प्रयत्न मनसे कार्यकर्त्यांनी केला. जुहू वर्सोवा लिंक रोडवरील अभिषेक अपार्टमेंट आणि शांतीवन म्हाडा, लोखंडवाला इथल्या इमारतीच्या आवारात बाईकवरुन मनसे कार्यकर्ते पोहचले. त्यांनी कपिल शर्माच्या विरोधात जोरदार घोषणाबाजीही केली. 

मात्र कपिलच्या ट्विटनंतर निर्माण झालेल्या वादग्रस्त परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर त्याच्या दोन्ही घराबाहेर कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. या बंदोबस्तामुळं मनसे कार्यकर्त्यांना आल्या पावली मागे फिरावे लागले.