महाराष्ट्र सरकारकडून २३ हजार मेट्रीक टन डाळ जप्त

राज्य सरकारनं साठेबाजांवर केलेल्या कारवाईतून तब्बल १९० कोटींची २३ हजार ३०० मेट्रिक टन डाळ जप्त करण्यात आलीय. एकट्या मुंबईतून २२ हजार मेट्रिक टन टाळ जप्त करण्यात आली असून त्याची किंमत १६५ कोटी इतकी आहे. 

Updated: Oct 21, 2015, 04:52 PM IST
महाराष्ट्र सरकारकडून २३ हजार मेट्रीक टन डाळ जप्त title=

मुंबई : राज्य सरकारनं साठेबाजांवर केलेल्या कारवाईतून तब्बल १९० कोटींची २३ हजार ३०० मेट्रिक टन डाळ जप्त करण्यात आलीय. एकट्या मुंबईतून २२ हजार मेट्रिक टन टाळ जप्त करण्यात आली असून त्याची किंमत १६५ कोटी इतकी आहे. 

छाप्यात सापडलेली डाळ लक्षात घेता कृत्रिम टंचाई निर्माण केली जात असल्याचं अन्न व नागरि पुरवठा मंत्री गिरीश बापट यांनी नमूद केलंय. राज्यात पद्धतशीरपणे साठेबाजी केली जात आहे. तसंच हे षडयंत्र असून यामागे कोण आहे याचा पाठपुरावा सरकार करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, सरकारच्या या आक्रमक कारवाईविरोधात डाळ व्यापाऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी व्यक्त होतेय. यामुळे सहा हजार कोटींचे व्यवहार ठप्प असलल्याचं डाळ व्यापाऱ्यांच्या संघटेनेनं म्हटलंय. 

बाजारात इतर स्वस्त डाळी उपलब्ध असताना शिवाय तुरडाळीविषयी इतका गहजब का उठवला जातोय, असा प्रश्नही डाळ व्यापऱ्यांनी उपस्थित केला. शिवाय येत्या पंधरा दिवसात डाळीचे भाव खाली येतील, असा विश्वासही व्यापाऱ्यांनी व्यक्त केलाय. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.