मार्डनं पुकारलेला संप घेतला मागे

मार्डने शुक्रवारी पुकारलेला संप मागे घेतला आहे. निवासी डॉक्टरांना संप करण्याचा अधिकार नसल्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं एका सुनावणी दरम्यान दिला होता. त्या आदेशानुसार अखेर मार्डने आपला उद्याचा संप मागे घेतलाय. 

Updated: Mar 16, 2017, 11:18 PM IST
मार्डनं पुकारलेला संप घेतला मागे  title=

मुंबई : मार्डने शुक्रवारी पुकारलेला संप मागे घेतला आहे. निवासी डॉक्टरांना संप करण्याचा अधिकार नसल्याचा आदेश मुंबई उच्च न्यायालयानं एका सुनावणी दरम्यान दिला होता. त्या आदेशानुसार अखेर मार्डने आपला उद्याचा संप मागे घेतलाय.

धुळ्यामध्ये डॉक्टरला झालेल्या मारहाणीचा निषेध म्हणून राज्यभरातले मार्डचे डॉक्टर संपावर जाणार होते. या संपामध्ये राज्यातल्या १६ वैद्यकीय महाविद्यालयांमधले ५ हजार निवासी डॉक्टर सहभागी होणार होते.  आता उद्या केवळ निदर्शनं केली जाणार आहेत. दरम्यान मार्डनं आपला प्रस्तावित संप मागे घेतल्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांची मात्र त्रासातून सुटका होणार आहे.