मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाबाहेर मनसेचं आंदोलन

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे.

Updated: Jul 2, 2016, 04:45 PM IST
मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाबाहेर मनसेचं आंदोलन  title=

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दादर येथे आयोजित करण्यात आलेल्या एका सार्वजनिक कार्यक्रमाबाहेर मनसे कार्यकर्त्यांनी आंदोलन केलं आहे. महापालिका चौकशीमधे रस्ते घोटाळ्यात दोषी आढळलेल्या ठेकेदारांवर गुन्हे नोंदवले, पण त्यांना अटक करण्यात आली नाही. या ठेकेदारांवर कारवाई करायला टाळाटाळ केली जात असल्याचा आरोप करत मनसेनं हे आंदोलन केलं.

या आंदोलनादरम्यान कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना काळे झेंडे दाखवण्याचाही प्रयत्न केला. कार्यक्रम स्थळापासून काही अंतरावर दादर पोलिसांनी मनसे कार्यकर्त्यांना अडवलं आणि ताब्यात घेतलं. मुख्यमंत्र्यांकडेच गृहखातं आहे, तरीही या ठेकेदारांना अटक होत नाही. मुख्यमंत्री दबावापोटी ठेकेदारांवर कारवाई करत नाहीत, असा आरोप मनसेनं केला आहे.