मुंबई: बांद्रा रेक्लमेशन परिसरात एका भराधाव कारनं रात्री एका तरुणाला जोरदार धडक दिली. या अपघातात २२ वर्षीय उमेश वेदकरचा मृत्यू झालाय. दुचाकीवर मागे बसलेला स्वप्निल गायकवाडही गंभीर जखमी झालाय.
कारनं बाईकला इतकी जबरदस्त धडक दिली की, उमेश रस्त्यावर पडल्यानंतर त्याचं डोकं फुटलं. तर स्वप्निल गायकवाड नावाचा तरुण गंभीर जखमी झाला. त्याच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पण गाडी नेमकी कोण चालवत होतं, याबद्दल कुठलही माहिती पुढे आलेली नाही. बांद्रा पोलीस सध्या याघटनेचा अधिक तपास करत आहेत.
दरम्यान, वांद्रे रेक्लमेशन परिसरात मागील पाच दिवसांपासून रस्त्यावरील वीजेचे खांब बंद आहे. त्याच्या फायदा घेत धडक देणारा कारचालक तिथून पसार झाला, असा आरोप मृत उमेशच्या मित्रांनी केला आहे.
* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.
* झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.