मुंबईत तरी विद्यार्थिनी आहेत का सुरक्षित?

दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर मुंबईतही विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आलाय. दिल्लीच्या तुलनेत सुरक्षित असलो, तरी या घटनेमुळे मुंबईतल्या विद्यार्थिनींना भीती वाटत आहे

Jaywant Patil जयवंत पाटील | Updated: Dec 24, 2012, 09:50 PM IST

www.24taas.com, मुंबई
दिल्लीत झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर मुंबईतही विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्या प्रश्न ऐरणीवर आलाय. दिल्लीच्या तुलनेत सुरक्षित असलो, तरी या घटनेमुळे मुंबईतल्या विद्यार्थिनींना भीती वाटत आहे
मुंबई विद्यापीठाचा देशातलं नावाजलेलं आणि मोठं विद्यापीठ असा लौकीक आहे...म्हणूनच या विद्यापीठात देशभरातून अनेक विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. यामध्ये मुलींची संख्याही लक्षणीय आहे. त्यामुळे सध्या या मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. दिल्लीतील घटनेनंतर मुंबई विद्यापीठात शिकाणा-या मुलींच्या सुरक्षेचं काय? हा प्रश्न विचारला जातोय. मात्र मुंबई विद्यापीठ मुलींच्या सुरक्षेची योग्य ती काळजी घेत असल्याचं विद्यापीठानं म्हटलंय.
विद्यापीठात शिकणा-या मुली सुरक्षित असल्याचा दावा विद्यापीठानं केला असला तरी नुकतीच मुंबईच्या चेतना महाविद्यालयाच्या आवारात घडलेली घटना मुंबईत शिकाणा-या मुलींच्या काळजीत भर टाकणारीच आहे. मात्र विद्यार्थिनींच्या सुरक्षेची जबाबदारी विद्यापीठावर असली तरीदेखील विद्यार्थिनींनीही जागरूक राहण्याची गरज आहे...