भटक्या कुत्र्यांप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला खडे बोल

भटक्या कुत्र्यांच्या उच्छादावर मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावलेत. भटक्या कुत्र्यांवरील एका याचिकेचं न्यायालयाने जनहीत याचिकेत रुपांतर केलंय. 

Updated: Jun 9, 2016, 11:37 PM IST
भटक्या कुत्र्यांप्रश्नी मुंबई उच्च न्यायालयाचे सरकारला खडे बोल title=

मुंबई : भटक्या कुत्र्यांच्या उच्छादावर मुंबई उच्च न्यायालयाने सरकारला खडे बोल सुनावलेत. भटक्या कुत्र्यांवरील एका याचिकेचं न्यायालयाने जनहीत याचिकेत रुपांतर केलंय. 

२०१३ साली सांगली जिल्ह्यात कुत्र्यानं चावा घेतल्यामुळे एका पाच वर्षांच्या मुलाला आपला जीव गमवावा लागला होता. वास्तविक पाहता भटक्या कुत्र्यांचं लसीकरण तसेच निर्बिजीकरण हि स्थानिक पालिका प्रशासनाची जबाबदारी आहे. 

याप्रकरणी मुलाचे वडील मारुती हाले यांनी वकिल पद्मनाभ पिसे यांच्यामार्फत नुकसान भरपाईसाठी हायकोर्टात याचिका दाखल केली होती. या याचिकेत सांगली मिरज महानगरपालिकेकडून २० लाखांची नुकसान भरपाई मागणी करण्यात आलीय.

या याचिकेची हायकोर्टातील जस्टीस व्हि एम कानडे आणि जस्टीस सोनाक यांच्या खंडपीठाने गंभीर दखल घेत त्याचं जनहित याचिकेत रुपांतर केलंय. तसेच राज्य आणि केंद्र सरकारने भटक्या कुत्र्याबाबत काय उपाययोजना केल्यात याबाबतची माहिती चार आठवड्यात सादर करण्यास सांगितली आहे.