मुंबई हायकोर्टाचे गणेश मंडळांना सुनावले, वर्गणी मागा खंडणी नको

 वर्गणी मागा, खंडणी नको, असे खडे बोल मुंबई हायकोर्टाचे गणेश मंडळांना सुनावले आहेत. मिरवणुकीतील वर्तन सुधारण्याचा सल्लाही दिलाय. त्याचवेळी मशिदीवरील भोंग्यांबाबतही नाराजी  दर्शवली  आहे.

Updated: Aug 28, 2015, 10:17 PM IST
मुंबई हायकोर्टाचे गणेश मंडळांना सुनावले, वर्गणी मागा खंडणी नको  title=

मुंबई : वर्गणी मागा, खंडणी नको, असे खडे बोल मुंबई हायकोर्टाचे गणेश मंडळांना सुनावले आहेत. मिरवणुकीतील वर्तन सुधारण्याचा सल्लाही दिलाय. त्याचवेळी मशिदीवरील भोंग्यांबाबतही नाराजी  दर्शवली  आहे.

गणेशोत्सवात वर्गणी मागताना मंडळांनी खंडणी मागितल्यासारखी वर्गणी मागू नये, असे बोल मुंबई उच्च न्यायालयानं गणेश मंडळांना सुनावले आहेत. नागरिकांनी सण उत्सव घरात राहूनच साजरे करावेत, त्यामुळे त्याचा कोणाला त्रास होणार नाही असा सल्लाही न्यायालयाने दिलाय.

विसर्जन मिरवणुकीतला गोंगाट किंवा मशिदींवरचे भोंगे यामुळे होणा-या ध्वनीप्रदूषणाबाबत न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली.  आज लोकमान्य टिळक असते तर अशाप्रकारे साज-या होणा-या सणांविषयी तीव्र नाराजी व्यक्त केली असती अशी टीपण्णी न्यायालयाने केलीय.

शिवाजी पार्कमध्ये आयोजीत श्री जगन्नाथ पुरी रथ यात्रेच्या परवानगीसाठी दाखल झालेल्या याचिकेसंदर्भात आणि नवी मुंबईतल्या काही मशिदींवरच्या बेकायदेशीर भोंग्यांसंदर्भातल्या याचिकेवरील सुनावणी दरम्यान न्यायालयाने हे खडे बोल सुनावले. या याचिकेवरील पुढील सुनावणी दोन आठण्यांनी ठेवण्यात आलीये. 

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*  झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.