आप 'झाडू'न मुंबई महापालिकेत उतरणार

दिल्ली विधानसभेतील घवघवीत यशानंतर आम आदमी पार्टीनं आपला मोर्चा मुंबई महापालिकेच्या निवडणूकांकडे वळवलाय. मुंबई मनपाच्या निवडणूका लढवण्याचं आपनं निश्चीत केलं असून पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात लढणार असल्याची घोषणा आपचे मयांक गांधी यांनी केली आहे.

Updated: Feb 11, 2015, 07:44 PM IST
आप 'झाडू'न मुंबई महापालिकेत उतरणार title=

मुंबई : दिल्ली विधानसभेतील घवघवीत यशानंतर आम आदमी पार्टीनं आपला मोर्चा मुंबई महापालिकेच्या निवडणूकांकडे वळवलाय. मुंबई मनपाच्या निवडणूका लढवण्याचं आपनं निश्चीत केलं असून पालिकेतील भ्रष्टाचाराविरोधात लढणार असल्याची घोषणा आपचे मयांक गांधी यांनी केली आहे.

दिल्लीच्या राजकारणात 'आप'ची जादू दिसून आली. ही जादू मुंबईत आजमावून पाहण्याची तयारी सुरु असल्याचे दिसत आहे. भल्या भल्यांचे आंदाज फोल ठरवत 'आप'ने आपला 'झाडू' फिरवत भाजप आणि काँग्रेस पक्षाला पराभवाची चव चाखायला लावली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या झंजावातला अरविंद केजरीवाल यांनी रोखले. या निवडणुकीत आपच्या उमेदवारांनी बाजी मारत ७० पैकी ६७ विजय संपादन केला. तर भाजपचे केवळ तीनच उमेदवार विजयी झालेत. काँग्रेसला खातेही खोलता आलेले नाही. तर बहुजन समाज पार्टीला अपेक्षीत मते न पडल्याने त्या पक्षाच्या मान्यतेवर प्रश्नचिन्ह आहे.    

दिल्लीतील विजयानंतर आता मुंबई पालिका निवडणुकीत 'आप'ने आपली ताकद अजमावण्याचा चंग बांधला आहे. त्यादृष्टीने तयारी करण्यात येणार असल्याचे मुंबईतील आपचे नेते मयंक गांधी यांनी सांगितले. त्यामुळे मुंबईत शिवसेना, भाजप यांना ही टक्कर असेल, असे संकेत त्यांनी यावेळी दिलेत.

* इतर ताज्या बातम्या सदैव पाहण्यासाठी झी २४ तासला फेसबुकवर जॉइंन करा.

*   झी २४ तासला ट्विटरवर फोलो करा.